Jan 31, 2010

Toch Chandrama Nabhat (in Marathi)

तोच चंद्रमा नभात , तीच चैत्र यामिनी
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी
तोच चंद्रमा नभात...

नीरवता ती तशीच, धूंद तेच चांदणे
छायांनी रेखियले, चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहीनी
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी
तोच चंद्रमा नभात...

सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे ? मी ही तोच, तीच तूही, प्रीती आज ती कुठे ? 
ती न असता उरात, स्वप्न ते न लोचनी
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी
तोच चंद्रमा नभात...
त्या पहिल्या प्रीतीच्या, आज लोपल्या खुणा वाळल्या फुलात व्यर्थ, गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून, भंगल्या सुरातुनी
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी
तोच चंद्रमा नभात...
[A fine song. Sung & composed beautifully by Sudheer Phadke and written by Shanta Shelke.]